November 20, 2025
जिल्हा बुलडाणा शेगांव शेतकरी

लासुरा परिसरात हरभरा पिक संकटात

शेगांव : मूग, उडीद, सोयाबीन, तुरीचे अस्मानी संकटाने नुकसान केले असताना आता हरभरा पिकावर वातावरणात बदलामुळे रोग पडला आहे. उपाययोजना करूनही उपयोग नसल्याने उत्पन्नात मोठी घट येणार आहे. पीक विम्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळण्याची अपेक्षा आहे. शेगाव तालुक्यातील लासुरा परिसरात गेल्यावर्षीच्या सुरुवातीपासून पिकावर अस्मानी संकटे येत गेली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे भरपुर प्रमाणात नुकसान झाले. मध्यंतरी कापूस पिकावर शेंदरी बोंड अळी आल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. तूर हे पीक साधारण चांगले होते. परंतु व्हायरस आल्यामुळे पिक सोंगणी लवकर करण्यात आले. त्यामुळे उत्पन्नात थोडीफार घट झाली. तसेच हरभरा या पिकावर शेतकर्‍यांची आशा उरलेली होती. परंतु हरभरा पिकावर धुरीमुळे फुल अवस्थेत असताना फुलगळ झाली,त्यामुळे या पिकाची उत्पन्नात घट झाली. सध्या हरभरा पिकावर वातावरणात बदल होत असल्यामुळे रोग आलेला आहे. या परिसरातील बर्‍याच शेतकर्‍यांनी पीक विमा काढलेला आहे. अद्यापपर्यंत पिक विम्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पिक विमा मिळावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.

Related posts

विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे पोटळी येथे एक बैल एक गाय जागीच ठार

nirbhid swarajya

जोशी नगरातील छकुली गार्डनमध्ये दोन गट आमने सामने

nirbhid swarajya

खामगाव शहर पोस्टचे ५ अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!