January 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

डीपी रोडवरील राघव संकुल येथून लाखोचा गुटखा जप्त

बुलढाणा येथील अन्न-औषध प्रशासन व शहर पोलिसांची कारवाई

खामगांव : येथील डीपी रोडवरील राघव संकुल मधील दुकानांमध्ये अवैधरित्या गुटका साठवून ठेवला असल्याची गुप्त पोलीस व अन्न प्रशासन विभागाला माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे छापा टाकून गुटका जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा येथील अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी व शहर पोलीस कर्मचारी यांना अवैधरित्या विकला जाणारा गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डीपी रोडवरील राघव संकुल मधील दुकानांमध्ये छापा टाकला असता त्यातून अंदाजे ७२ पोते गुटका जप्त केला आहे. यामध्ये ५० पोते नजर व १२ पोते गोवा तसेच ७ पोते-आर जे कंपनीचा गुटखा असा ऐकून ३५ लाख ६४ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अजय सिद्धार्थ खंडारे २२ रा शिरजगांव देशमुख याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात अवैधरीत्या गुटखा विक्री होत आहे मात्र याकडे पालकमंत्री व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी बुलढाणा रवींद्र सोळंके यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध भादवि कलम १८८,२७२, २७३,३२८ भादवि सकलम अन्न सुरक्षा अधिनियम कायदा २००६ चे कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय रंजीतसिंह ठाकुर करीत आहेत. सदरची कारवाई बुलढाणा अन्न सुरक्षा अधिकारी तसेच शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे.

Related posts

लॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त किती कोरोना अहवाल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह?

nirbhid swarajya

डोंगराजवळ आढळले इसमाचे प्रेत; घातपाताचा संशय

nirbhid swarajya
error: Content is protected !!