January 1, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 230 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 84 पॉझिटिव्ह

195 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा
: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 314 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 230 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 84 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 72 व रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 154 तर रॅपिड टेस्टमधील 76 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 230 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगाव शहर : 13, शेगाव तालुका : पहूर जीरा 1, कालवड 1, नागझरी 1, सवर्णा 1, नांदुरा शहर :8, नांदुरा तालुका : खडतगाव 1, संग्रामपूर तालुका : मंदारी 1, कुलमखेड 1, सिंदखेड राजा तालुका : तांदुळवाडी 1, मलकापूर शहर :2, मलकापूर तालुका : कुंड बु 3, चिखली तालुका : सवणा 1, अन्वी 1, कोलारा 1, मेरा बू 1, चिखली शहर : 9, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी 1, बुलडाणा शहर : 4, खामगाव शहर : 14, खामगाव तालुका : गराड गाव 2, बोर जवळा 5, घाटपुरी 1, लोणार तालुका : पांगरा डोळे 1, राजणी 2, गोट्टा 1, लोणार शहर : 1, दे. राजा शहर :1, मेहकर शहर : 3, मुळ पत्ता वाझेगाव जि. अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 84 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान नांदुरा येथील 65 वर्षीय पुरुष व वडजी ता. मलकापूर येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


तसेच आज 195 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : लोणार : 12, मलकापूर :21, मेहकर :1, जळगाव जामोद :13, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 11, खामगाव :31, शेगाव : 33, सिंदखेड राजा: 2, मोताळा: 12, चिखली : 41, दे. राजा :6, नांदुरा : 14.
तसेच आजपर्यंत 29452 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5667 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5667 आहे.
आज रोजी 892 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 29452 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6854 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5667 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1101 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 86 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

राज्यसरकारच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी अनुदानित बियाण्यापासून वंचित राहणार – आ.ॲड आकाश फुंडकर

nirbhid swarajya

सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी केले फेस शिल्ड,मास्क व सॅनिटायझरचे वाटप

nirbhid swarajya

पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!