November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन दोघांच्या आत्महत्या

खामगांव : शहरातील दाळफैल येथील एका ४० वर्षीय इसमाने तर शिवाजी नगर येथील १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. खामगांव शहरातील दाळफैल येथील ४० वर्षीय इसम भूपेश रतनलाल हिरवाने याने घरी कोणी नसताना राहत्या घरातील छताच्या ऐंगलला दोरिच्या सहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृतकाचा भाऊ घरी आल्यावर सदर घटना उघड़किस आली. तर दुसर्‍या घटनेत शिवाजीनगर भागातील १८ वर्षीय श्रीरंग पांडुरंग गोरे युवकाने घरी कोणी नसताना राहते घरात जिन्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही घटनेत नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये मर्गाची नोंद करण्यात आली आहे.या दोन्ही आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.

Related posts

शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

nirbhid swarajya

आमदार आकाश फुंडकर यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

nirbhid swarajya

युथ पॅंथरच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

nirbhid swarajya
error: Content is protected !!