सिंदखेडराजा: तालुक्यातील चांगेफळ येथील विदुपा नदी वरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी केलेल्या तीन युवकांचा बंधाऱ्यामध्ये पडुन मृत्यू झाला आहे. चांगेफळ येथील युवक गंगाराम शांताराम भालेराव वय २८ वर्ष या युवकांचा मृतदेह सापडला असून ज्ञानेश्वर धोंडीराम भालेराव वय २२ वर्ष रा.चांगेफळ व मंठा तालुक्यातील कांनडी येथील अविनाश सुरेश बांगर या दोघांचे मृत्यदेह सापडले नाही,बेपत्ता मृतदेहांचा शोध सुरू आहे. १३ सप्टेंबर च्या रात्री बंधाऱ्याला पाऊस पडल्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी होते. १४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ५ युवक पोहण्यासाठी विदुपा नदी वरील बंधाऱ्यावर गेले होते.पाण्या मध्ये पोहत असतांना युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही व पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पाण्याच्या भोवऱ्यात एक युवक पाण्यामध्ये बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला, परंतु त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सोबतचे दोन युवक सुद्धा पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे व पाण्यामध्ये भोवरा अडकल्याने ते पाण्यात बुडाले सोबत असलेले दोन युवकांनी यांची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. घटनेची महिती मिळताच पोलीस विभागा व महसूल विभाग घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे