January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शिक्षण शेतकरी

अखेर एसटी बसेस 20 ऑगस्टपासून धावणार; आदेश निघाला

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन 6 अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील बस सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात अंतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉक डाऊन मध्ये एसटीची अत्यावश्यक सेवे शिवाय राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती, त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी दिली होती.

जिल्हा व तालुका अंतर्गत सुरू असणारी एसटी आता जिल्ह्याच्या बाहेरही धावणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पास ची आवश्यकता नसणार आहे. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यातील एसटी बसेस 23 मार्च पासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. 22 मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्हा अंतर्गत वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.सरकारकडून मिशन अंतर्गत सवलती दिल्या जात आहेत,त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. नागरिकांना ग्रामीण भागात प्रवासासाठी महत्त्वाचे आणि मुख्य साधन म्हणून एसटी कडे पाहिले जाते.एसटीचा प्रवास बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसत होता. राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो, या काळात वस्तू आणि प्रवाशांच्या वाहतूक केले जाते. त्यात एसटी बंद असल्याने प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होत्या,मात्र आता एसटी बसेस सुरू झाल्याने नागरिकांना फायदा होणार आहे.

Related posts

अडकून पडलेल्या नागरिकांना घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज

nirbhid swarajya

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त भव्य राज्यस्तरीय रक्तदान शिबीर

nirbhid swarajya

मानसी नाईक चा वाढदिवस बोथा गावात साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!