October 6, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा मनोरंजन

दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट

खामगांव : जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे यंदा पारंपारिक दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषावरही विरजन पडले आहे. दरवर्षी जन्माष्टमी तथा गोकुळ अष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जात असतो. मात्र या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात 31आगस्टपर्यंत लॉकडाउन असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नसल्याने या दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडणार आहे. जिल्ह्यात लॉकडाउन बरोबरच 144 कलम जारी असल्याने दहीहंडी कार्यक्रमावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा शहरात दहीहंडी उत्सवास मुकावे लागणार असल्याने दहीहंडी फोडणारे गोविंदा व हा खेळ पाहणार्यांच्या उत्साहाला लगाम बसला आहे.

Related posts

शेगावात मुंबई रिटर्न डॉक्टर तर बुलडाण्यात एक पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटखा

nirbhid swarajya

प्रसाद डांगे ची वैद्यकीय शिक्षणाकरीता निवड….

nirbhid swarajya
error: Content is protected !!