January 6, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळला,घातपाताची शक्यता

बुलडाणा : तालुक्यातील ग्राम चिखला जवळ घाटातील झुडपात 7 कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून घातपाताची शक्यता असल्याचे बोलल्या जात आहे.
पोलिस सुत्रानुसार, बुलडाणा ग्रामीण ठाणे हद्दीत असलेल्या चिखला या गावातील समाधान वाघ यांनी मोबाईलवरून 7 ऑगस्टला पोलिस पाटील विवेकानंद सुभाष वाघा यांना माहिती दिली की रंजनाबाई सुधाकर वाघ यांच्या चिखला गावा जवळ बुलडाणा-धाड मार्गावरील घाटात गट नं.118 मधील पडीत जागेत सागाच्या झुडपात अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत पडून आहे. दरम्यान बुलडाणा ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला व पंचनामा करण्यात आला.अंदाजे 40 ते 45 वर्षीय इसम 4-5 दिवस अगोदर मृत पावल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.रिंढे मॅडम यांनी घटनास्थळीच पोस्टमार्टम केले आहे.यावेळी ठाणेदार सारंग नवलकर, बिट जमादार राज़ीक शेख,गंगेश्वर पिंपळे,संदीप मिसाळ,पीएसआई सुनील दौड,नीलेश राऊत यांचेसह बुलडाणा एलसीबीचे एपीआय मोरे,फोरेंसिक यूनिट,डॉग यूनिटने घटनास्थळाची पाहणी केली असून काही ठोस पुरावे सद्या मिळाले नसून मात्र त्या ठिकाणी काही तरी जाळल्याचे खुना दिसून आले आहे.या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद बुलडाणा ग्रामीण ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Related posts

जलदिनानिमित्त चिखली बु येथे कलश यात्रा

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ०९ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 269 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 27 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!