November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी

टिळक पुतळ्या जवळील 3 दुकानामधे चोरी..

चोरटा CCTV मधे कैद…

खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात शनिवार-रविवार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.याचा फायदा घेत टिळक पुतळा भागातील कॉटन मार्केट रोडवरिल स्वीट मार्टच्या तीन दुकानांच्या शटर चे कुलुप तोडून हजारो रुपयाची चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघड़किस आली. चोरी करणारे इसम हे दुकानाच्या सीसीटीवी मधे कैद झाले असुन एका आरोपिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या महितीनुसार कॉटन मार्केट रोडवरील नितिन गुरबाणी,अनिल बसंतवाणी,निलेश भागदेवाणी यांच्या तीन दुकानाच्या शेटर चे कुलुप तोडून भागदेवाणी यांच्या दुकानातील अंदाजे नगदी १४ ते १५ हजार व बसंतवाणी यांच्या दुकानातील नगदी १,५०० तर गुरबाणी यांच्या दुकानाचे फक्त कुलुप तोडून अंदाजे १६ हजार पाचशे रूपयांचा माल चोरी गेल्याची घटना ३१जुलै रात्रीच्या दरम्यान घडली. तर आज २ ऑगस्ट सकाळच्या सुमारास निलेश भागदेवाणी यांनी त्यांच्या मोबाइल वर जोडलेले CCTV पाहिले असता बंद दिसल्याने ते दुकानाची पाहणी करण्या करिता गेले असता ही घटना उघड़किस आली.यावेळी दुकानाचे शटर उघड़े दिसले त्यामुळे आजु बाजुच्या दुकानाची पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. ही घटना CCTV मधे कैद झाली आहे.अशी माहिती शीतलदास मघनदास दुकानाचे संचालक निलेश भागदेवाणी यांनी निर्भिड स्वराज्य शी बोलताना दिली.cctv फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्वरित आपले चक्र फिरवून चोराचा शोध घेऊन त्यांच्याकडून त्याने लपवलेले पैसे व त्याला अकोला बायपास वरून अटक केले. त्याचा सोबत असणारा चोर साथीदार हा पळुन गेला आहे तर त्याच्या शोध घेवून त्याला सुद्धा अटक करण्यात येणार आहे,असेही पोलिसांनी सांगितले आहे. निलेश भागदेवानी यांच्या तक्रारी वरून चोरा विरुध्द कलम ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Related posts

शेगाव बसस्थानकावर इसमाच्या खिशातून २१ हजार चोरले,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

nirbhid swarajya

सुटाळा खु.ग्रामपंचायत सदस्या सौ.शितल ठाकरे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी

nirbhid swarajya

शहरात चौकाचौकात मोकाट जनावरांचा हैदोस

nirbhid swarajya
error: Content is protected !!