November 20, 2025
मेहकर

गांव रक्षणासाठी रणरागिणी उतरल्यात मैदानात

मेहकर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मधील गंवढाळा गट ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. ताई गजानन जाधव व उपसरपंच अल्काबाई संदिप खरात या रणरागिणी गांव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी विविध योजना राबवत आज अफल्लातुन शक्कल लढवत, बुजगावणे सायकल वर बसवुन ,मै कोरोना हु, बुलाता हूं,मगर पास आने का नही ! असा संदेश देत गावात जनजागृती करण्यात आली.
सोशल मीडियात ‘ बुलाती है,मगर जाने का नही, या गाण्याचा ट्रेंड चालला होता. तोच ट्रेंड उचलत महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव यांनी बुजगावण्यावर संदेश देत लोंकाना घराबाहेर विनाकारण फिरू नका या साठी जनजागृती केली आहे.’ मैं कोरोना हूॅं, बुलाता हूॅं, मगर आने का नहीं, असा संदेश दिल्याने परिसरातील नागरिकांचे याकडे लक्ष्य वेधुन जात आहे.गंभिरतेने सांगुनही नागरिकांना पटत नसलेल्या अनेक गोष्टी विनोदी पध्दतीने सांगितल्याने सहज पटतात.याचीच प्रचिती गंवढाळा/कंबरखेड गट ग्रामपंचायत मध्ये पाहवायास येत आहे.

Related posts

जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू व अन्य पिकाचे नुकसान

nirbhid swarajya

देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही आधाराची गरज..

nirbhid swarajya

शिक्षण दिनानिमित्त आपल्या गावातील मुख्यालयी राहत असलेल्या शिक्षकांचे पूजन करा-भाजपा आमदार प्रशांत बंब…

nirbhid swarajya
error: Content is protected !!