October 6, 2025
बातम्या

शहीद चंद्रकांत भाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवानांकडून शेगावात वृक्षारोपण

गो ग्रीन फाउंडेशन चा उपक्रम


शेगांव :काश्मिर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आलेल्या पातुर्डा येथील शहीद चंद्रकांतजी भाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जवान मित्रांनी स्थानिक गौलखेड रोडवरील देवांशी नगर मधील ओपन स्पेसमध्ये सपत्नीक वृक्षारोपण करून आपल्या शहीद मित्राला आगळीवेगळी श्रद्धांजली दिली. या कार्यक्रमाचे संयोजन शहरातील पर्यावरणप्रेमी संघटना गो ग्रीन फाँडेशन ने केले होते.
या कार्यक्रमाची पार्श्वभूमी फारच रंजक आहे. गो ग्रीन फाँडेशन पर्यावरण पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्येक कामात अग्रेसर आहे. या बद्दल सी.आर.पी.एफ. एका जवानाने आपल्या गावाकडे गो ग्रीन फाँडेशन कश्या प्रकारे कार्य करत आहे या बाबत आपल्या अन्य मित्रांसोबत चर्चा केली. त्यानुत त्यांनी आपल्या गावाकडे असलेल्या जवान मित्राशी संपर्क साधला व गो ग्रीन फाँडेशन च्या सहकार्याने या वृक्षारोपण कार्यक्रमाचा संकल्प साकार झाला. या प्रसंगी शहीद चांद्रकांतजी भाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच शहरात कोरोना विरुद्धच्या लढाईत योगदान देणाऱ्या सफाई कामगारांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित जवानांना गो ग्रीनच्या कार्याची माहिती देण्यात आली असता सर्वांनी फाँडेशनच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी सी.आर. पी.एफ.जवान संदीप राऊत, गणेश कुरवाडे, गणेश ठाकरे, पुरुषोत्तम तायडे, रवींद्र पारस्कर,पंडित कोकाटे, मंगेश कोल्हे, बी.एस.एफ.जवान विजय बढे, आय. टी. बी.पी.जवान शिवशंकर ढोरे, आर.पी.एफ,जवान अमर गोमासे व महाराष्ट्र पोलीस श्री वासुदेव वानखडे आपल्या खास गणवेशात उपस्थित होते.

Related posts

10 Predictions About the Future of Photography

admin

कॉलेज ऑफ मॅनेजमेंट विज्ञान विभागाची “ईश्वेद “ बायोटेक कंपनीला भेट

nirbhid swarajya

राज्यातील तीन दिवस ग्रामपंचायत बंद…

nirbhid swarajya
error: Content is protected !!