November 20, 2025
खामगाव

कोरोनाला हरवून जवान परतला कर्तव्‍यावर

खामगाव : कोरोना या शब्‍दाने सध्या अख्ये विश्‍व हादरले आहे. एका विषाणूमुळे अनेकांच्‍या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशात अनेक जण आहेत की जे आपले कर्तव्‍य तत्‍परतेने आपल्‍या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र सेवा देत आहेत. यामध्ये एक नाव आहे खामगाव येथील वैभव वनारसे यांचे.. ते सध्या आयटीबीपी या सैन्‍यदलात कार्यरत असून कोरोनाला हरवून लेह लडाख येथे सेवा देत आहेत. सध्या देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या संसर्गाला रोखण्यासाठी शासनाच्‍या वतीने विविध उपाययोजन अंमलात आणल्‍या जात आहेत व राबविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर आहे. त्‍यामुळे डॉक्‍टर, पोलिस कर्मचारी हे आपला जीव धोक्‍यात घालून आपले कर्तव्‍य पार पडतांना दिसून येत आहेत. देशातील लोकांच्‍या आरोग्‍याची काळजी जसे डॉक्‍टर घेत आहेत.

त्‍याचप्रमाणे देशाच्‍या सुरक्षेसाठी सैन्‍यदलातील जवान देखील आपले कर्तव्‍य पार पाडत आहेत. येथील चितांमणी नगरातील रहिवासी असलेले वैभव वनारसे हे आयटीबीपी या सैन्‍यदलात कार्यरत असून त्‍यांना देखील कोरोना आजाराने ग्रासले होते. मे महिन्‍याच्‍या २५ तारखेला त्‍यांचा रिपोर्ट पॉझिटीव्‍ह आल्‍याने त्‍यांच्‍यावर उपचार सुरु होते. दरम्‍यान ९ जून रोजी  त्‍यांची प्रकृती सुधारली असून त्‍यांनी प्रकृती सुधारताच कोणतीही सुटी न घेता. सध्याची ते कर्तव्‍यावर असलेल्‍या भागातील तणावाची परिस्‍थिती पाहता  कर्तव्‍यावर रुज होण्यास त्‍यांनी प्राधान्‍य दिले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रखर देशभक्‍तीचा येथे परिचय आला आहे. जिथेे लोक आजारापासून स्‍वःला वाचविण्यासाठी घरात बंदीस्‍त झालेले असतांना वैभव वनारसे यांचा निर्णय किती धाडसी  आहे हे दिसून येते. वैभव वनारसे हे २०१३ साली सैन्‍यदलात भरती झाले असून  २०१८ पासून ते लेह लडाख येथे सेवा देता आहेत. सध्या भारत चीन या दोन देशांमध्ये तणावाची परिस्‍थिती आहे. हे माहिती असून सुध्दा वनारसे यांनी देशसेवेला प्राधान्‍य दिल्‍याने  त्‍यांच्‍या या निर्णयाचे कौतुक होत आहे.कोरोना आजारा सदंर्भात सांगताना ते म्‍हणाले की, हा संसर्गजन्‍य रोग असल्‍याने धोका जास्‍त आहे. परंतु यापासून बचाव करण्यासाठी शासनाने दिलेल्‍या उपायोजनांचे पालन केल्‍यास यापासून नक्‍कीच बचाव होतो.  आम्‍ही सिमेवर असतो त्‍यामुळे संपुर्ण देशवासी निश्‍चिंत होवून सर्वत्र वावरत असतात. सध्या देश मोठ्या संकटात आहेत. त्‍यामुळे कोरोना आजारातून बरा झाल्‍यावर सुटी घेवून आराम करण्याच्‍या पर्यायाला न निवडता कर्तव्‍याला प्राधान्‍य दिले. 

Related posts

जिल्हाधिकारी यांनी केले कोविड नियम पाळण्याचे आवहन

nirbhid swarajya

भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्यकारणी गठीत

nirbhid swarajya

शा.तं.नि माजी-विद्यार्थी संघातर्फे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता मदत

nirbhid swarajya
error: Content is protected !!