January 7, 2025
खामगाव

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या विद्युत नुकसान दुरुस्ती करिता खामगाव येथील टीम रवाना

खामगाव : निसर्ग चक्री वादळामुळे महावितरणच्या पायाभूत वीज वाहिन्यांची सुविधा विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक गावांत, शहरात विजेचे खांब उखडून पडले आहेत. सर्व वीजपुरवठा खंडित झाला आहे. यासाठी कॉर्पोरेट कार्यालयाने या पार्श्वभूमीवर पुढील सूचनांपर्यंत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरुन आवश्यक नुकसान नियंत्रण आणि पुन्हा स्थिती पूर्ववत जलदगतीने करता येईल यासाठी खामगाव  विभागातील जलंब कनिष्ठ अभियंता कुंदन भापकर यांच्या नेतृत्वात शहर व शेगांव उपविभागातील कर्मचारी रायगड जिल्ह्यातील पेन साठी मार्गस्थ झाले आहेत. अरुण भुसारी, ए आर चहांडे, कुंदन भापकर, योगेश जाधव, योगेश आमले, संतोष अदबाने, रेविनानाथ धांधरे, मनोज नागरगोजे, शिवशंकर कान्हेरकर, शेख मस्तान शेख बशीर, जुनेद शाह, नंदकिशोर ठाकरे, गोपाल शेळके, योगेश वनारे, विकास तेल्हारकर, विलास तरवाडे, अमोल सावळे, सूरज खरात, पारसराम रिंढे,अजय बावस्कर,  वाय अार खंडागळे, ए ए इंगळे, ए डी सातव, आर पी राठोड, ए आर पाठक, सी जी रावणकर, एस एम कोळी, के एस बाविस्कर यांचा सहभाग आहे.

Related posts

सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या पदाधिकाऱ्यांना पिकअपची धडक

nirbhid swarajya

कोरोनाला हरवून जवान परतला कर्तव्‍यावर

nirbhid swarajya

आयपीएल वर जुगार : शिवराज फॉर्म हाऊस वर पोलिसांचा छापा

nirbhid swarajya
error: Content is protected !!