November 20, 2025
खामगाव

खामगावातील जिनींगविरुध्द एफ.आय आर दाखल करा – जिल्हाधिकारी

खामगांव : शासनाच्या वतिने सिसिआय मार्फत कापुस खरेदी केंद्रे सुरु केली असुन या अंतर्गत खामगावातील आठ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरींनी सिसिआय सोबत करार केला होता. त्यानुसार अंकुर जिनिंग, भारत जिनिंग, शाम जिनिंग, ओमशंकर जिनिंग‌ या जिनिंग फॅक्टर्यांनी शासनाच्या नियमाप्रमाने कापुस‌‍ खरेदी सुरु केली होती, मात्र एल.आर. जिनिंग, शाकांबरी ईंडस्टीज, सुगोसा जिनिंग फॅक्टरी यांच्यासह एका फॅक्टरीने कापुस खरेदी केली नव्हती म्हणून जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हान यांनी जा.क्र.वि.४/कापुस‌ खरेदी बंद/१५३५ व १५३६ २०२० कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र एमआयडीसी सुगोसा जिनिंग व शेगांव रोड वरील जय शाकांबरी जिनिंग‌ फँक्टरी यांनी कापुस खरेदी सुरु केली नाही. त्यामुळे या दोघांनीही हेतू पुरस्पर कराराचे भंग केल्याचे निदर्शनास आले होते. म्हणुन जिल्हाधिकारी यांनी जय शाकांबरी जिनिंग‌ फँक्टरी‌ प्रो.प्रा. अतुल गोपा‌ल धानुका रा. खामगाव व  सुगोसा जिनिंग फँक्टरी प्रो.प्रा. मुकेशकुमार गोकुलचंद सानंदा यांच्या विरुध्द जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे एफ.आय.आर नोंद करण्याचे आदेश २ जुन रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. वरील दोन्ही फँक्टरी सुरु केलेल्या नाहीत जिल्हा उपनिबंधकांनी साहय्यक निबंधक यांना दिलेल्या आदेशात नमुद केले आहे की वरील दोन्ही फँक्टरी मालकांविरुध्द स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये‌ जिल्हा‌ व्यवस्थापक भारतीय‌ कपास निगम लि.(सिसिआय) यांच्या समवेत गुन्हा नोंद केल्याबाबत कारवाई तात्काळ करणे बाबात आपला अहवाल मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे कार्यालयाकडे दिनांक ३ जुन २०२० रोजी सादर करावे असेही जिल्हा उपनिबंधक डाँ. महेंद्र चव्हान यांनी आदेशात नमुद केले आहे. या आदेशाची प्रत सभापती व सचिव यांना देऊन त्यांनी जय शाकांबरी जिनिंग‌ फँक्टरी व सुगोसा जिनिंग फँक्टरी यांचा बाजार समितीचा परवाना तात्काळ रद्द करणेबाबत कारवाई करुन या कार्यालयाला व जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल कळवावा असेही नमुद केले आहे.

Related posts

सामान्य रुग्णालयात स्वच्छता राखा – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

तापमानाला रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज: हवामान अभ्यासक पंजाबराव डख

nirbhid swarajya

बावनबीर येथे घरावर वीज कोसळली,घराचे नुकसान जिवीत हानी टळली

nirbhid swarajya
error: Content is protected !!