January 6, 2025
आरोग्य जळगांव जामोद

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करा – आ.डॉ.संजय कुटे

जळगांव जा. : कंत्राटी गट-अ या पदावर काम करणाऱ्या बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २ जून रोजी पत्राद्वारे केली आहे. कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढत असल्याने वैद्यकीय सेवेतील कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टरांना सुरक्षितता प्रदान करणे गरजेचे आहे शिवाय त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असाव्यात त्यामुळे शासनाने कंत्राटी गट-अ पदावर काम करणाऱ्या बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांच्याही मानधनात वाढ करण्याची गरज असून शासन निर्णय क्रमांक 2020 प्र. क्र. 152 सेवा 3 दिनांक 29 मे 2020 सार्वजनिक आरोग्य विभाग नुसार कंत्राटी व बांधपत्रीत वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या शासन निर्णयामध्ये आदिवासी व दुर्गम भागात काम करणारे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांचा उल्लेख केला आहे covid-19 चा सामना करण्यासाठी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट-अ सुद्धा तत्पर सेवा देत आहे त्यामुळे मानधन वाढीचा निर्णय घेताना त्यांच्या मानधनात वाढ करणे गरजेचे आहेत करिता बीएएमएस वैद्यकीय अधिकारी मानधन वाढीचा निर्णयात अंतर्भाव करावा असे पत्रात नमूद असून यावर माजी मंत्री आ. कुटे यांची सही आहे.

Related posts

दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; एक जण जागीच ठार, दोन गंभीर….

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 253 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 124 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

खामगावात आढळले ४ कोरोना बाधित रुग्ण

nirbhid swarajya
error: Content is protected !!