शेगाव : एकाच कुटुंबातील आठ सदस्य करोनाच्या लढाईत आरोग्यसेवेचे व्रत हाती घेऊन कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना विषाणूने केलेल्या जागतिक हल्ल्यात अख्खं जग भोवंडून गेलं आहे.संपूर्ण जगात करोनाचा कहर सुरु असताना प्रशासन, डॉक्टर, पोलीस यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे जीवाची बाजी लावून अहोरात्र कशाचीही पर्वा न करता देशसेवा करत आहेत. अशाच प्रकारे शेगाव शहरातील महाजन कुटुंबातील एक नव्हेतर आठ सदस्य कोरोना लढाईत सामील आहेत शेगाव शहरातील सौ. सुनीता महाजन ह्या येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालययेथे कक्षसेवीका म्हणुन कार्यरत आहेत. या ठिकाणी त्या कोरोना बाधित व्यक्तींची काळजी घेत आहेत. तसेच सौ लक्ष्मी गणेश महाजन ह्या सुनीता महाजन यांच्या स्नुषा असुन त्या यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेज येथे स्टाफ नर्स म्हणुन कर्तव्यावर आहेत. कोरोनाच्या लढ्यात कोविड इमर्जन्सी सेवेत त्या कार्यरत असल्याने त्यांचा १४ वर्षाचा मुलगा प्रथमेश व ५ वर्षांचा मुलगा आयुष याला आजी व काकूकडे सांभाळायला ठेवले असुन, त्या करोना लढाईत महत्वाची भुमिका पार पाडत आहेत.५ वर्षांचा मुलगा आयुष या बाळाला आजीकडे ठेवुन त्याकर्तव्य बजावत असुन, मुलाच्या वाढदिवसालाही त्यांना जाता आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. मात्र, रुग्ण सेवेतून देशसेवा महत्त्वाचीअसल्याचे सौ लक्ष्मी महाजन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लॉकडाऊन मध्ये आपल्या कामातून देशसेवेला महत्त्व देणाऱ्या मंगेश महादेव महाजन हे अकोला सिटी कोतवाली पोस्टेला शिपाई म्हणून कार्यरत आहेत त्यांचेही कोरोना युद्धात महत्वाचे योगदान आहे तसेच सौ. प्रिया विजय महाजन ह्या सेवानिवृत्त महसुल अधिकारी यांच्या पत्नी असून त्या अमरावती येथील येरवीन हॉस्पिटलमध्ये अधिपरीचारिका म्हणून कार्यरत असून कोरिनाच्या लढ्यात त्या कोविड इमर्जन्सी सेवेत कार्यरत आहेत तसेच सौ पल्लवी महाजन – वराडे ह्या औरंगाबाद येथील कामगार हॉस्पिटल मध्ये अधिपरीचारिका म्हणुन काम पाहतात.सध्या त्या करोनाच्या लढ्यात परिचारिका संवर्गाची व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.तसेच याच कुटुंबातील कु. पूजा एकनाथ वैराडे ही अकोला मेडिकल कॉलेज येथे अधिपरीचारिका म्हणून कर्तव्यावर असून कुठलीच परवा न करता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून याप्रतिकुल परिस्थितीत कोरोना युद्धात सहभागी आहेत तसेच विनोद दिगंबर गिते हे माजी सैनिक पुत्र असून हे अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौकीदार म्हणून कार्यरत आहेत ते आपल्या ड्युटीलाच आपला धर्म मानून अहोरात्र रुग्णसेवेत तत्परसेवा असतात त्यांचा मुलगा प्रतीक विनोद गिते हा पण अकोला येथील खासगी रुग्णालयात ब्रदर म्हणून कार्यरत आहे या लढाईत हे कर्तव्यदक्ष आपली लहान मुले दुर ठेवुन करोनाशी लढतआहेत. करोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणारे सगळेच प्राण पणाला लावून काम करीत आहेत.किंबहुना त्यापेक्षा जास्त आरोग्य सेवेचे कार्यकरत असून, करोना लढाईत पुर्णपणे सज्ज होउनत्या लढाईत उतरले आहेत.तसेच सेवा बजावत असताना डॉक्टर व नर्स यांना प्रोटेक्टिव किट अंगावर चढवणे व उतरवने याला एक शिष्टम आहे या प्रक्रियेला साधारण २० मिनिटे लागतात त्यामुळे एकदा का ही किट घातली की किमान ६ ते ७ तास काढता येत नाही या उन्हाळ्या दिवसात पाणीही त्यांना पिता येत नसल्याने अशा प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी स्वताचा जीव धोक्यात टाकत आहे अशा कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या योद्धांना निर्भिड स्वराज्य चा मानाचा मुजरा. |
previous post