November 20, 2025
महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन आहे. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईत १७ नोव्हेंबर १९३८ साली त्यांचा जन्म झाला होता. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रातून १९५८ साली त्यांनी पदवी संपादन केली होती. बँक ऑफ इंडियामध्ये २० वर्ष त्यांनी नोकरी सुद्धा केली होती.
१९५५ मध्ये त्यांनी ‘वेडी माणसं’ या एकांकीकेपासून लेखनाची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांचे वय १६ वर्षच होते. त्यांची ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती.
रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना आदरांजली वाहत आहेत. मतकरी यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झाल्याची भावना साहित्यिक बोलून दाखवत आहेत. निर्भिड स्वराज्य कडुन त्यांना भावपूर्ण श्रदांजलि.

Related posts

भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा चे औचित्य साधून 75 व्या अमृत महोत्सव निमित 75 जणांनी केले रक्तदान

nirbhid swarajya

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला…

nirbhid swarajya
error: Content is protected !!