November 20, 2025
खामगाव

शा.तं.नि माजी-विद्यार्थी संघातर्फे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता मदत

खामगांव : कोरोना विषाणू प्रादुर्भावमुळे राज्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत गरीब, गरजू लोकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधीला व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार आज १५ मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव माजी-विद्यार्थी संघातर्फे प्रधानमंत्री सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता छोटीशी मदत म्हणून प्रत्येकी ११००० असे एकूण २२००० रकमेचे धनादेश मुकेश चव्हाण (उपविभागीय अधिकारी खामगांव ) यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी प्रविण पुंडकर (कोषाध्यक्ष) दुष्यंत केडिया (सदस्य)  सचिन सोनी (अधिव्याख्याता स्थापत्य अभि. व माजी-विद्यार्थी) आदी उपस्थित होते.

Related posts

आज गोविंदा दहीहंडी फोडणार…

nirbhid swarajya

दोन वनराई बंधाऱ्याची निर्मिती करून ते अडकले विवाह बंधनात

nirbhid swarajya

माजी नगराध्यक्ष गणेश माने राष्ट्रवादीत परतले

nirbhid swarajya
error: Content is protected !!