April 17, 2025
खामगाव

लॉकडाऊन मध्ये विक्की बुधवानी व मित्र मुक्या जनावरांप्रती जोपासत आहेत सद्भावना

खामगाव : प्राणी मात्रावर दया करा या संतांच्या वचनाप्रमाणे खामगांव येथील लक्कडगंज भागात राहणारे व मोबाईल व्यावसायीक विक्की बुधवाणी व त्यांचा मित्र अंकित गांधी हे दोघे जण मिळून शहरातील मोकाट जनावरांना गत १६ दिवसांपासून पोळ्या, बिस्कीट व पाव देवून त्यांची भुक भागविण्याचे कार्य करीत आहेत. लॉकडाऊन काळात शहरातील गरीब व गरजुंना शहरातील दानशूर, सामाजिक संगठना यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात येत आहे. या मदतीच्या माध्यमातून गरजू लोक आपल्या पोटाखी खळगी भरत आहेत. मात्र लॉकडाऊन काळात शहरातील मोकाट जनावरे चाऱ्यासाठी वणवण भटकत असल्याचे विक्की यांनी पाहून आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च मुक्या जनावरांच्या चाऱ्यासाठी खर्च करण्याचे ठरविले होते. पण लॉकडाऊन असल्याने कडबा, कुटार भेटणे अशक्य असल्याने ते आपल्या घरीच पोळ्या तयार करीत आहेत सोबतच बिस्कीट व पाव घेवून शहरातील विविध भागात फिरून ज्या ठिकाणी त्यांना जनावरे दिसतील त्यांना ते खाऊ घालीत आहेत. १४ एप्रिल पासून विक्की बुधवानी यांनी हे कार्य सुरू केले आहे. विक्कीच्या या कार्यामुळे मोकाट जनावरांची भुक भागविण्यास मदत होत आहे.  लॉकडाऊन संपेपर्यंत मुक्या जनावरांसाठी आमच्या परीने जे जे शक्य आहे ते आम्ही करायला तयार आहे असे विक्की बुधवाणी यांनी सांगितले आहे.

Related posts

दोन गटात तुफान हाणामारी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

समता क्रिडा मंडळाची भिमजयंती उत्सव समितीची कार्यकारणी गठित

nirbhid swarajya

ट्रक व मोटार सायकल चा अपघात पत्नी व मुलगा ठार

nirbhid swarajya
error: Content is protected !!