April 19, 2025
बुलडाणा

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे, ८७ रेशन दुकाने निलंबित तर ४८ दुकानांचे परवाने रद्द

बुलडाणा जिल्ह्यातील ४ दुकानांचे परवाने रद्द तर एकावर दुकानदारावर गुन्हा दाखल

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी  राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेअसून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.तसेच यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.

अमरावती महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती विभागात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून ५ दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही वाशीम जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. तर त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले असून त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यात १ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Related posts

सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे फेसबुक अकाउंट हॅक,राज्यात खळबळ…

nirbhid swarajya

बुलडाणा रोडवर अपघात ; एकाचा मृत्यु

nirbhid swarajya

दुकाने उघडण्याचे परवानगीसाठी नाभिक समाजाचे निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!