November 20, 2025
बुलडाणा महाराष्ट्र

शहीद जवान चंद्राकांत भाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

साश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप शहीद जवान अमर रहे.. घोषणांनी आसंमत निनादला

बुलडाणा : जम्मू कश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर क्षेत्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर शनिवार १८ एप्रिल रोजी आंतकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये जिल्ह्यातील पातुर्डा ता. संग्रामपूर येथील सीआरपीएफचे जवान चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पातुर्डा ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी चंद्रकांत भाकरे यांना अखेरचा निरोप दिला.

आज सकाळी पातुर्डा गावातून शहीद चंद्राकांत भाकरे यांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर सीआरपीएफ च्या विशेष वाहनातून पार्थिव अंत्यंसंस्कार स्थळी आणण्यात आले. दरम्यान गावातून पार्थिव वाहनातून आणत असताना गावकऱ्यांनी सामाजिक अंतराचे पालन करीत शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्प वर्षाव केला. अंत्यसंस्कार स्थळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहली. खासदार प्रतापराव जाधव,आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, सीआरपीएफचे अधिकारी संजय लाटकर, संजय कुमार व ए.पी माहेश्वरी, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसिलदार समाधान राठोड, सरपंच शैलजाताई भोंगळ यांनीही शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहली.
शहीद जवान यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, एक भाऊ एवढा आप्त परीवार आहे. शहीद जवान चंद्रकांत भाकरे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १७९ व्या बटालीयनमध्ये कार्यरत होते. चंद्रकांत भाकरे २ सप्टेंबर २००४ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झालेले असून ते जम्मू कश्मिरमध्ये कर्तव्यावर होते. त्यांच्या चितेला छोटा मुलाने चिताग्नी दिला. तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले. गावातून पार्थिव आणतांना पातुर्ड्याच्या आसंमत शहीद जवान अमर रहे, चंद्रकांत भाकरे अमर रहे या घोषणांनी निनादून गेला.

Related posts

आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या ऐकास अटक

nirbhid swarajya

शिवांगी बेकर्स कंपनी प्रशासनाविरोधात कामगारांनी उपसले कामबंद आंदोलनाचे हत्यार

nirbhid swarajya

पहिला ‘मूकनायक’ पुरस्कार पत्रकार राहुल पहुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान

nirbhid swarajya
error: Content is protected !!