April 19, 2025
बुलडाणा शेतकरी

कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी – विक्री सुरू

सोशल डिस्टसिंग पाळत बाजार समितीच्या नियोजनानुसार शेतमाल विक्रीस आणावा   – जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन


बुलडाणा : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत. यामध्ये सर्व शेतमालाची खरेदी करण्यात येत आहे. बाजार समितीचे कामकाज सुरू असताना कोरोना विषाणू प्रादुर्भाव होणार नाही, यासठी सर्व आवश्यक सूचना संबंधित बाजार समित्यांना देण्यात आलेल्या आहेत. बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी – विक्री होत असताना गेटवर सॅनीटायझर व हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करणे, सर्वांनी तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळून सोशल डिस्टसिंग पाळणे, परिसर व स्वच्छतागृह स्वच्छ करणे, परीसर निर्जंतुकीकरण करणे, शेतमालाचा लिलाव करताना शेतमालाचे ढेर विशिष्ट अंतरावर टाकणे, वेगवेगळ्या शेतमालाचा वेगवेगळ्या वेळेवर करणे, गर्दी टाळण्याकरीता शेतकऱ्यांची नोंदणी पद्धत अंवलंबिणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

सर्व शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणण्यापूर्वी बाजार समितीचे सचिव किंवा संबंधीत अडते, व्यापारी यांचेसोबत संपर्क करून त्यांनी केलेल्या नियोजनानुसार वेळ व दिनांक प्राप्त करून घ्यावे. त्याच वेळेमध्ये शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा. संचारबंदीत शेतमाल विक्रीस आणण्यासाठी पोलीसांनी मुभा दिलेली आहे. तरी वरील सर्व उपाययोजना अंमलात आणून कोरोना आजाराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे. शेतमाल विक्रीबाबत अधिक माहितीसाठी बाजार समित्यांचे सचिव यांना संपर्क करावा.

सपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :  बुलडाणा सचिव श्रीमती वनिता साबळे ९४२२८८४७४५, मोताळा सचिव एस. जी राहणे ९४२१४७३२९७, मलकापूर सचिव बी. जे जगताप ९४२२९४०६८१,  नांदुरा सचिव गौरव गवळे ९५४५७७४२९७, जळगांव जामोद सचिव प्र. ना पुदागे ९४२१४६५०७७, संग्रामपूर सचिव पी. एन मारोळे ९६३७११०७४७, शेगांव सचिव वि. गु पुंडकर ८१४९७७४४४१,  खामगांव सचिव एम.एस भिसे ७७२००३९५६१,  चिखली सचिव आर. जे शेटे ९४२३७३९९४१,  मेहकर सचिव श्री. बार्डेकर ९०११२२७९९८,  देऊळगांव राजा सचिव कि. वी म्हस्के ८८३०८३८७७१, सिंदखेड राजा सचिव ओ. व्ही महाजन ९९२३६०६५६३ आणि लोणार सचिव रा. ते वायाळ ९८९०४६४८२५ . 

 
सौजन्य DIO buldana

Related posts

दि चिखली अर्बन बँकेकडून महिलां बचत गटांना १८ लाखांचे कर्ज वाटप

nirbhid swarajya

नॅशनल शाळेजवळील खड्डा ठरतोय वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ; नगर परिषदेचे दुर्लक्ष

nirbhid swarajya

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पस्थळी 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली…

nirbhid swarajya
error: Content is protected !!