April 18, 2025
महाराष्ट्र

करोनाग्रस्तांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार


मुंबई : २६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांपाठोपाठ मॉल्सही बंद राहणार आहेत असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे. करोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारच करणार आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ज्या रुग्णांमध्ये सुधारणा होते आहे त्यांना घरी सोडण्यात येईल. कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ३० मार्चपर्यंत मॉल्स बंद राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गर्दी टाळण्यासाठी मॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.‘वर्क फ्रॉम होम’ ज्या कंपन्यांना शक्य आहे ते त्यांनी अंमलात आणावं असंही निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.  ट्रेन आणि बस-सेवा अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. अनावश्यक प्रवास टाळा असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.  चित्रपटगृहं किंवा मॉल्स सुरु ठेवले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही सुरु राहतील, मात्र अनावश्यक गर्दी, प्रवास टाळावा. योग्य ती खबरदारी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Related posts

भेंडवळ घटमांडणी ला कोणताही शास्त्रीय आधार नाही- रघुनाथ कौलकार

nirbhid swarajya

‘सूर्यपुत्रा’ची कथा मोठ्या पडद्यावर

nirbhid swarajya

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा….

nirbhid swarajya
error: Content is protected !!