November 20, 2025
बातम्या

नसबंदी बाबत अजूनही पुरुषी अहंकार कायम…वर्षभरात जिल्ह्यात केवळ ३१ पुरुषांच्या शस्त्रक्रिया…


बुलढाणा : पूर्वी चूल आणि मूल हेच महिलांचे विश्व समजले जायचे कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीचा हा प्रभाव होता मात्र काही समाजसुधारकांनी ही प्रथा मोडीत काढत महिलांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार प्रदान केले तर अजूनही काही बाबतीत पुरुषी अहंकार कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यातलंच एक उदाहरण म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबत पुरुषांची उदासीनता.विविध बंधनाच्या चौकटीतून आणि बऱ्याच अनिष्ट रूढी – परंपरेतून महिलांची सुटका झाली खरी मात्र अजूनही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी महिलांचीच भरड सुरू असल्याचे चित्र बुलडाणा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे, कुटुंब नियोजनासाठी महिलां सोबतच पुरुष देखील शस्त्रक्रिया करू शकतात त्यासाठी शासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली मात्र या शस्त्रक्रियेने नपुसकता येणे , जड काम न होणे असे गैरसमज असल्याने पुरुष या शस्त्रक्रियेसाठी समोर येत नसल्याचे सांगण्यात येते…बुलडाणा जिल्ह्याला २०१९ – २० या आर्थिक वर्षात १५१९२ एवढं वार्षिक उद्धिष्ट देण्यात आलंय ज्यामध्ये ग्रामीण भागासाठी ११३६६ तर शहरी भागासाठी ३८२६ एवढं उद्धिष्ट देण्यात आलंय त्यापैकी ४२१६ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, ज्यामध्ये ३५६१ महिला तर फक्त ४१ पुरुषांचा समावेश आहेनसबंदी शस्त्रक्रिया करण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची तुलना ही केवळ हातावर मोजण्या एवढी आहे , आणि त्यातही ग्रामीण भागापेक्षा सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागात याचे प्रमाण तर नगण्यच म्हणावे लागेल , पुरुष वर्ग ही शस्त्रक्रिया करून घेण्यास पुढे येत नसल्याचं आजवरच चित्र आहे, त्यामुळे शासकीय जनजागृती बरोबरच खऱ्या अर्थाने गरज आहे ती या अहंकारी पुरुषी मानसिकतेला मूठमाती देण्याची.

Related posts

वारीहनुमानच्या डोहात शेगावच्या युवकाचा बुडून मृत्यू

nirbhid swarajya

जिल्ह्यात वाजणार ग्रामपंचायत निवडणूक चे बिगुल…

nirbhid swarajya

शेगाव तालुक्यात रेती माफीयांचा सळसुळाट…पुर्णा नदीपात्रातून होत आहे अवैध रेतीची वाहतूक…

nirbhid swarajya
error: Content is protected !!