खामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गोसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप नुकताच ग्राम ज्ञानगंगापूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ज्ञानगंगापूर येथे ज्ञानासोबतच श्रम संस्काराची सुद्धा गंगा वाहिल्याचे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शाहीना पठाण यांनी केले. ग्राम ज्ञानगंगापूर येथील सरपंच माननीय श्री ज्ञानेश्वर महाले पाटील तथा इतर मंडळींनी सदर श्रमसंस्कार शिबिराला जे सहकार्य केले त्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या भविष्यकाळात मोठी फलश्रुती मिळेल असा विश्वास यावेळी गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.
गावामध्ये झालेले श्रमदान व विद्यार्थ्यांमधील शिस्त पाहून सदर श्रमसंस्कार शिबिर यशस्वी झाल्याची भावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ दीपक नागरिक व प्रा डॉ. नीता बोचे यांनी बोलून दाखवली. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ सुवर्णा अमोल गावंडे यांनी आयुष्यभर कर्मरत राहण्याचे फायदे गावकऱ्यांना तथा स्वयंसेवकांना विविध उदाहरणांमधून समजावून सांगितले. याप्रसंगी यशस्वी उद्योजक श्री उल्हासराव ईवरकर, श्री शिवदास महाले पाटील, कृतिशील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री अमोलजी गावंडे, प्रज्ञा लांजेवार, तिवारी मॅडम, सहायक कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन शिंगणे, प्रा उमेश खंदारे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यावेळी विविध पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने उत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार श्री प्रकाश सुरेंद्र शर्मा, सुजाता अशोक वाघोदे यांना उत्कृष्ट स्वयंसेविका, रायगड- सिंहगड -शिवनेरी व तोरणा या गटांना उत्कृष्ट गट, रुद्राक्ष भरत सोळंके यांना श्रमप्रतिष्ठा, ओम विलासराव पाटील यांना कार्यनिष्ठा पुरस्कार, प्रशांत अनिल गव्हांदे यांना नवसंकल्प बुद्धिजीवी पुरस्कार, गौरवजी पुरुषोत्तम शेगोकार यांना अन्नपूर्णा पुरस्कार तर पंकज तानाजी भोपळे, प्रिया राजेंद्र बगाडे व अनुराधा संतोष सुडोकार यांना योगीक क्रियान्वय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ओम आडेल यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश वाघमारे, आनंद निकाळजे, प्रशांजीत गव्हांदे व अजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक तथा स्वयंसेविकांनी मेहनत घेतली.

