November 20, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख व्यापारी सामाजिक

खामगाव जालना रेल्वे मार्ग लवकर होण्यासाठी बुलढाणा अर्बनचा पुढाकार…

३०० कोटींचे रोखे खरेदी व विक्रीसाठी पुढाकार घेणार

बुलढाणा : सहकाराला सामाजीक कार्याची जोड देऊन समाजातील विविध उपेक्षित घटकांसाठी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या बुलडाणा अर्बन संस्थेच्या वतीने खामगाव – जालना रेल्वे मार्ग लवकर होण्यासाठी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष भाईजी राधेश्याम चांडक यांनी पुढाकार घेतला असून रेल्वे विभागाच्या माध्यमातून वित्त विभागाने खामगाव- जालना रेल्वे मार्गासाठी रोखे विक्री करण्यास पुढाकार घेतल्यास बुलढाणा अर्बन १०० कोटीचे रोखे स्वतः विकत घेणार आणि २०० कोटीचे रोखे बुलढाणा व जालना जिल्ह्यातील इतर सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून विकून देणार आहे.बहुप्रतिक्षित खामगाव – जालना रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार आणी राज्य सरकार अनुकूल आहे राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागाबाबत केंद्रीय रेल्वे बोर्डाने राज्य शासनाला पत्र दिली. राज्य शासनाने अंतरिम अर्थसंकल्पात अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभाग करण्यास राज्य शासनाने अंतरिम अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. तशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री ना अजित पवार यांनी केल्यानंतर, आशिया खंडातील सर्वात मोठी व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बुलढाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीद्वारे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी १०० वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्ग साठी बुलढाणा अर्बन शंभर कोटी रुपयांची रोखे खरेदी करणार आहेत तर २०० कोटींचे रोखे इतर सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती भाईजी राधेश्याम चांडक यांनी दिली आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बुलढाणा अर्बनचे व संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे कौतुक होत आहे.

Related posts

आयपीएल सट्टावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही

nirbhid swarajya

टीव्ही जर्नालिस्ट संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

nirbhid swarajya

ग्रामपंचायतीवर सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यास प्राधान्य द्या..! उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

nirbhid swarajya
error: Content is protected !!