खामगाव : स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या सीएचबी प्रा. कु. रोशनी धरमकार यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या वतीने पीएचडी (रसायनशास्त्र) पदवी प्रदान करण्यात आली प्राध्यापक. धरमकार यांना डॉ. जी. डी. तांबटकर यांचे मार्गदर्शन लाभले. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोबडे, उपाध्यक्ष अशोक झुनझुनवाला, सचिव डॉ. प्रशांत बोबडे, प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, प्राध्यापक व कर्मचारीवृदांनी त्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.