October 6, 2025
अमरावती खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख सामाजिक

सुटाळा बुद्रुक येथे श्रीहरी कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताह…

खामगांव: सुटाळा बुद्रुक येथील महादेव संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त १८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत नाथ भागवत श्रीहरी कीर्तन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दररोज सकाळी पाच ते सहा काकडा आरती, सकाळी सहा ते सात श्री विष्णु सहस्रनाम, सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत ग्रंथ पूजन, सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत भागवत कथा व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत पुरुषोत्तम मास महिमा, दुपारी पाच ते सायंकाळी साडेसहा पर्यंत हरिपाठ व रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.

भागवताचार्य ह.भ.प. विनायक महाराज भोपळे निमगाव यांच्या अमृततुल्य वाणीतून कथा वाचन होणार आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आव्हान सप्ताह समितीचे अध्यक्ष विजय (बंडू)बोदडे यांनी केले आहे.

Related posts

अबब..एका गावात निघाले १३२ साप

nirbhid swarajya

चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेश पोपट यांची हत्या

nirbhid swarajya

अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा झाला भारतीय नौदल सैनिक! सर्व जाती धर्माच्या वतीने फुलांचा वर्षाव करून केला सन्मान वाजत गाजत काढली मिरवणूक

nirbhid swarajya
error: Content is protected !!