पाच जणांवर गुन्हा दाखल शहर पोलिसांची कारवाई…
खामगाव-: बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांवर शहर पोलिसांनी आज कारवाई करत त्यांच्याकडून ८३ रील नायलॉन मांजा जप्त केला आहे. मकरसंक्रातीचा सण जवळ आल्याने शहरात पतंगबाजीला ऊत आला असून शहरात बऱ्याच ठिकाणी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत आहे. दरम्यान शहर पोलिसांनी आज मोची गल्ली भागात छापे मारुन ३८ हजाराचा नायलॉन रील मांजा जप्त केला.या प्रकरणी पोलिसांनी महेश दिनेश पवार, मुकेश चंपालाल चव्हाण, रतन चंपालाल चव्हाण, जितेंद्र उत्तमचंद गोयल व सुनिल अमरचंद पवार सर्व रा. मोची गल्ली यांच्याविरुध्द कलम ३३६ भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.