April 18, 2025
खामगाव जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नांदुरा जळगाव जामोद महामार्गावर भीषण अपघात…

नवी येरळी जवळ झाला अपघात…

दोन दू चाकींचा समोरा समोर झाला अपघात...

नांदुरा : 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जळगाव जामोद महामार्गावर नवी येरळी जवळ गजानन महाराज मंदिराच्या अलीकडे दोन दू चाकींचा समोरा समोर अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार एका दूचाकीवर एक महिला आणि एक लहान बाळ तर दुसऱ्या दूचाकीवर दोन तरूण असे एकंदरीत पाच लोक या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.अपघात होताच मोठ्या प्रमाणावर लोकांचा जमाव तिथे झाला.तर काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने समोर येवून रोडने जाणाऱ्या चारचाकी गाडींना थांबवले.यावेळी पोलीस बांधवांनी सुद्धा सामाजिक दायीत्व दाखवत त्या अपघात ग्रस्थांना पोहचवण्यासाठी मदत केली.त्या पाचही जखमींना रुग्णालयामध्ये घेवून गेले असून त्यांचे गाव आणि नाव अद्याप समजू शकले नाही.

Related posts

श्रीगुरुदेव नवदुर्गा मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

nirbhid swarajya

10 Predictions About the Future of Photography

admin

पंजाब सरकारच्या निषेधासाठी भाजपाची मुक निदर्शने

nirbhid swarajya
error: Content is protected !!