लाखनवाडा:श्रीकृष्ण चौधरी.जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात येथे साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त गावातून शांततेचा संदेश देत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कँडल मार्च काढण्यात आला. कमशिल बुद्ध विहार येथे त्रिसरन पंचशिल घेऊन गावातील प्रमुख मार्गाने जाऊन तथागत भगवान बुद्ध यांच्या यांची मूर्ती व मेणबत्ती पेटवून मंगल मैत्री, प्रज्ञा शील करुणा, चां संदेश देत उपासक व उपसिका सहभागी झाले.गावातील प्रमुख मार्गाने जाऊन बस स्टँड वरील जेतवण बुद्ध विहार येथे तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी ज्येष्ठ व्यक्ती विश्राम पातोडे, शेषराव तायडे, सुनील इंगळे, श्रीपत पातोडे, समाधान सरदार, सहदेव वाकोडे, बाळाराव सरदार, उपसरपंच प्रकाश इंगळे, शिक्षक मनोज सरदार , अमोल वाकोडे, आदी यांनी अभिवादन केले. बस स्टँड वरून पुन्हा कँडल मार्च हा मराठी प्राथमिक शाळा मार्गे कमलशिल बुद्ध विहार मध्ये या मार्चचा समारोप झाला. या कँडलचे आयोजन मिलिंद क्रीडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.या मध्ये सुमित वाकोडे, अनिल वानखेडे, योगेश वाकोडे, संजय इंगळे, सागर वाकोडे, वैभव वाकोडे अजय सरदार, सचिन वानखडे, विवेक वाकोडे,नैतिक वाकोडे, सतीश इंगळे, रविद्र इंगळे, संदीप मोरे,सूरज सुरवाडे, यांनी सर्व कँडल मार्च मध्ये सहभागीना खीरचे वाटप करून सहभाग घेतला. या निमित्त हिवरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन वाघ साहेब, बीट जामदार भोपळे, रवींद्र गायकवाड व सर्व हिवरखेड येथील पोलिस कर्मचारी वर्ग उपस्थित होते.