ढोल ताश्याच्या तालावर भिरकले चिमुकले
खामगाव लाखनवाडा ( श्रीकृष्ण चौधरी )गेल्या अनेक दिवसापासून कोरोना महामारी मुळे अनेकांचे जीवन ठप्प झाले होते.यामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालय बंद पडली होती,त्यामूळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना शाळांनी विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने व नवीन प्रवेश करण्याच्या हेतूने लाखनवाडा येथील मराठी प्राथमिक शाळेने अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मराठी प्राथमिक शाळेमध्ये दाखल करण्यासाठी आव्हान केले.यासाठी विद्यार्थ्यांनी गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली यामध्ये ढोल-ताशांच्या गजरामध्ये संपूर्ण गावांमधून प्रभातफेरी काढून शाळा पूर्वतयारी उपक्रम म्हणून चौकाचौकांमध्ये विद्यार्थी ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थी थीरकाले या वेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असलेले शैक्षणिक माहिती देणारे फलक संपूर्ण प्रभात फेरी चे आकर्षण ठरले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पांढरे सर यांनी मराठी सह सेमी इंग्लिश तसेच दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य द्वारे आम्ही देत असून यासाठी अद्यावत माहिती असणारा संपूर्ण उच्चशिक्षित टीचर स्टाफ असून पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मराठी शाळेमध्ये दाखल करण्याचे आव्हान केले या वेळी संपूर्ण शाळेचा स्टाफ व शालेय समितीचे अध्यक्ष ,अंगणवाडी सेविका सुद्धा उपस्थित होत्या