April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर

अनधिकृतपणे‌ लिंबाचेझाड तोडणाऱ्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

नांदुरा:तालुका येथून जवळच असलेल्या वडनेर भोलजी येथे कुठलीही पूर्वसूचना न देता तशेच तहसील कार्यालयाची परवानगी न घेता विद्युत पोल उभारून तारा ओढण्यासाठी वडिलोपार्जित लावण्यात आलेले कडुनिंबाचे झाड तोडणाऱ्या विज वितरणच्या सहायक अभियंता राणे यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी हरी किसन जुमडे यांनी तहसीलदार नांदुरा यांच्याकडे एका निवदेनाद्वारे केली आहे सविस्तर असे की नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे विद्युत वितरण कंपनीकडून सर्रास झाडांच्या कत्तली चालू आहेत यातच हरी किसन जुमडे यांच्या मालकीच्या गट क्र.२२१ मध्ये वडिलोपार्जित कडू लिंबाचे झाड होते‌.हे झाड हेतुपुरस्सर ते नष्ट करण्याच्या हेतूने विद्युत पोल उभारुन तारा ओढण्यात आल्या. याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही किंंवा तहसीलदार यांची परवानगी घेतलेली नाही.एकीकडे शासनाकडून वृक्ष संगोपनावर करोडो रूपये खर्च केले जात असतांना विज वितरणच्या कर्मचाऱ्याकडून अशाप्रकारे वृक्षाची कत्तल करुन शासनाच्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रकार होत आहे.तेव्हा असे कृत्य करणाऱ्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी हरी किसन जमडे यानी केली आहे.

Related posts

चाँद दिसला; ‘रमजान’चे उपवास सुरू

nirbhid swarajya

१६ वर्षापासून बुलढाणा अर्बनची सेवा अविरत

nirbhid swarajya

Google Pixel 2 Specifications & Features Revealed By FCC

admin
error: Content is protected !!