November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

क्वारंटाईन सेंटर मधून संशयित आरोपी रुग्ण पळाला….

खामगांव: घाटपुरी रोड वरील क्वारंटाईन सेंटर मधून एक इसम पळून गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्रज येथील सोन्याच्या नकली गिन्नी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता, तर त्यामध्ये २५ आरोपी अटक करण्यात आले होते. यामध्ये तपासादरम्यान काल ९ मे रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय जयपालसिंह ठाकूर यांनी एका संशयित आरोपीला अंत्रज येथून ताब्यात घेवुन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीएसआय ठाकूर यांनी त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याची सामान्य रुग्णालयात रॅपिड टेस्ट कोरोना चाचणी केल्याने त्याचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने घाटपुरी रोडवरील क्वारंटाईन सेंटर मधे काल दुपारी ४ वाजे दरम्यान क्वारंटाईन करण्यात आले होते. थोड्यावेळाने डॉक्टर तेथे त्याची पाहणी करीता आले असता संशयित आरोपी रुग्ण हा सेंटर मधून पळून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सेंटरवर गोंधळ उडाल्याने खळबळ निर्माण झाली होती. या सेंटरवर पोलीस तसेच सिक्युरिटी गार्ड असून सुद्धा अशी घटना घडतेच कशी प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच हा संशयित आरोपी रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये कसे काय ठेवण्यात आले होते हासुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. विशाल मनीराम चव्हाण वय २२ रा.अंत्रज असे या पळून जाणाऱ्या संशयित आरोपी रुग्णाचे नाव असून याप्रकरणी पोलीस नायक शैलेश राजपूत यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रुग्ण विशाल मनीराम चव्हाण याचे विरुद्ध भादवी कलम २,३,४ साथ रोग अधिनियमा नुसार कलम १८८,२६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नापोका प्रदीप मोठे करीत आहे.

Related posts

जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

nirbhid swarajya

आज प्राप्त 9 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 3 पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

मुख्याधिकारी आकोटकर साहेब तुम्ही खरंच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहात का ?

nirbhid swarajya
error: Content is protected !!