January 6, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

बुलडाणा रोडवर अपघात ; एकाचा मृत्यु

खामगांव : येथून जवळ असलेल्या मांडका खुटपुरी फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास टाटा एस गाडी व टॅंकरची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात टाटा एस मधील एक जण जागीच ठार झाला आहे. मिळालेल्या महितीनुसार संत विहार कॉलनी येथील शांताराम मनोहर गावंडे वय ५४ हे भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. ते काल ९ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास आपल्या टाटा एस वाहन क्रमांक एम एच-३०-एबी-२०८९ या गाडीवार आपला व्यवसाय करून गोंधनापुर येथून घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच-२४-ए यू २६८८ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या टाटा एस वाहनाला समोरुन जोरदार धडक दिली. सदर धडक इतकी जोरदार होती की, या धडकेत शांताराम मनोहर गायकवाड यांचा जागिच मृत्यु झाला. तर सदर टॅंकर चालक हा त्याच्या ताब्यातील टॅंकरने अपघात करून जखमीस कोणतीही मदत न करता टॅंकर सोडून घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी मृतकाचे चुलत भाऊ सुभाष गंगाराम गावंडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी टॅंकर चालकाविरुद्ध भादवि कलम २७९, ३०४(अ)४२७ कलम १८४ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका शेख हमीद करीत आहेत.

Related posts

माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलनाच्याअध्यक्ष पदी अँड.श्रीकांत तायडे तर कार्याध्यक्ष पदी पत्रकार गजानन राऊत यांची निवड

nirbhid swarajya

ओबीसी आरक्षण सुनावणी 19 जुलै रोजी..तोवर आता,राज्यातील नगरपालिका निवडणूक स्थगित

nirbhid swarajya

क्वारंटाईन करण्यासाठी राखीव ठेवलेल्या रुग्णालयाची दुरावस्था

nirbhid swarajya
error: Content is protected !!