November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र शेतकरी

ग्रामीण भागासह आता शहरातही काढा घेण्याला अनेकांची पसंती

कोरोनामुळे गुळवेल वनस्पतीच्या काढ्याचा वापर वाढला

गुळवेलाने हाडातील ताप नष्ट होत रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास परिणामकारक

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे, त्यामुळे गुळवेल वनस्पती चा काढा घेण्यासाठी नागरिकांचा मोठा कल दिसत आहे. आरोग्याच्या दृष्टीने गुळवेलाने अनेक फायदे असल्याने या वनस्पती ची मागणी आता वाढली असून बरेचशे कुटुंब आता या वनस्पती चा काढा घेतांना दिसत आहेत. आयुर्वेदिक उपचार पद्धतीत गुळवेल वनस्पती चे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे, या वनस्पती चा काढा घेतल्यास हाडातील ताप नष्ट होते व रोगप्रतिकार शक्ती वाढते. यासह विविध प्रकारच्या आजारांवर गुळवेल हे उत्तम गुणकारी असून याचा कुठलाही दुष्परिणाम नसल्याचे जाणकार सांगतात. तर कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे गरजेचे असल्याने इतर आजारांपासून दूर राहण्यासाठी या वनस्पती चा काढा घेण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसत आहे… पूर्वीपासून ग्रामीण भागामध्ये याचा वापर केला जातो, मात्र आता गुळवेल काढायचा वापर हा शहरी भागातही होत असल्याचे दिसत असून या वनस्पती ची मागणी वाढली आहे. गुळवेल ही वनस्पती प्रामुख्याने आंबा आणि निंबाच्या झाडावर पाहायला मिळते, या वेलीचे लहान तुकडे करून पाण्यात उकडून तो काढा उपाशी पोटी सेवन केल्यास आरोग्यासाठी याचा फायदा होत असल्याने अनेक कुटुंबात लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत हा काढा घेत असल्याचे दिसत आहे.

Related posts

गुटखा प्रकरणात जामीन मिळू नये- ना. डॉ. शिंगणे

nirbhid swarajya

तात्पुरते कारागृहातून फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक

nirbhid swarajya

मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाज आक्रमक लवकरच उग्र आंदोलन – मराठा क्रांती मोर्चा

nirbhid swarajya
error: Content is protected !!