January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र शेगांव

जखमी हरिणीला वाचविण्यात अपयश

डॉ.जोहेब पटेल व मित्रांनी केले शर्थीचे प्रयत्न

शेगाव : वरवट बकाल शेगाव मार्गावर एका जखमी हरिणीचे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या या हरिणीला वाचवण्यासाठी शेगाव येथील डॉ जोहेब पटेल आणि त्यांच्या मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी अवस्थेत गर्भ असलेली हरिण आढळून आल्याची माहिती वनरक्षक यांना देण्यात आली. वरवट बकाल कडून शेगाव कडे येत असताना डॉ.जोहेब पटेल यांना सकाळी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले एक मोठे हरीण दिसून आले. यावेळी त्यांना आपली कार थांबवून सदर हरिणीला पाणी पाजले. यांनतर त्यांनी याची माहिती जळगाव जामोद विभागाचे वनरक्षक यांना फोनवर दिली. सदर वन रक्षकाने डॉ.जोहेब पटेल यांना आपल्या कार मध्ये टाकून हरिणीला वरवट बकाल पर्यंत आणून देण्याची विंनती केल्यावरून डॉ.पटेल आणि पवन उगले, कृष्णा सातव यांच्या मदतीने जखमी हरीनाला वरवट बकाल येथे पोहचविले. मात्र सदर हरीण जास्त गंभीर झाली होती. यावेळी त्यावर तात्काळ उपचार करून तिला जीवनदान देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला मात्र यश आले नाही. शेगाव परिसरात अन्न पाण्याच्या शोधात आपला अधिवास सोडून हे हरिण आले असावे. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

मँट्याडोर व दुचाकीच्या धड़केत १ ठार; १ जण जखमी

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 321 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 93 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

जिल्हाधिकारी यांची सामान्य रुग्णालयात भेट; कोविड परिस्थितिचा घेतला आढावा

nirbhid swarajya
error: Content is protected !!