November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

दिवसाढवळ्या चोराने केली बॅग लंपास

खामगांव : शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे अशातच काल महावीर चौकातील नरोत्तम दास मेडिकलवर एका नागरिकाचे लक्ष विचलित करून ५० हजार रुपयाची बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गजानन नगरी भागातील विश्‍वनाथ विठोबा मडावी वय ५६ हे काल २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महावीर चौकातील नरोत्तम दास मेडिकल वर उभे होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तुमचे काय पैसे खाली पडले आहेत असे सांगितले, विश्वनाथ मडावी हे पैसे उचलण्यास गेले असता पायरीवर ठेवलेली प्लास्टिकची कॅरीबॅग मधून पैसे लंपास केले. मडावी यांनी बांधकामासाठी बँकेतून ५० हजार रुपये काढले होते. बॅग चोरी करणारे अज्ञात व्यक्ती हे विना नंबरची दुचाकी घेऊन आले होते तर तोंडाला रुमाल सुद्धा बांधला होता. चोरटे हे मडावी यांचा बँकेपासून पाठलाग करीत असल्याची शक्यता वर्तवली आहे या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३७९ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय रवींद्र लांडे करीत आहे.

Related posts

लॉयन्स क्लब ऑफ खामगांव सिल्व्हरसिटी वतीने भव्य लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

nirbhid swarajya

चिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेश पोपट यांची हत्या

nirbhid swarajya

आदर्श नवयुवक मंडळाची गणेशोत्सव कार्यकारणी गठित…

nirbhid swarajya
error: Content is protected !!