November 21, 2025
अमरावती आरोग्य जिल्हा पुणे बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शिक्षण

जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरु

सर्व परीक्षा केंद्र सज्ज….

बुलडाणा : शहरातील १२ परीक्षा केंद्रावर कोरोना विषयक असाच तगडा बंदोबस्त राहणार असून हे सर्व साहित्य थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुरविण्यात आलेले आहे. कोरोनामुळे अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा अखेर कोरोनाच्या प्रकोपातच घेण्यात येत आहे. सकाळी १० ते २ आणि ३ ते ५ अशा दोन टप्प्यांत परीक्षा होत आहे. जिल्ह्यातील एकूण ३९१२ परीक्षार्थींसाठी शहरात १२ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. सामाजिक अंतर राखण्यासाठी या केंद्रातील (शाळा, महाविद्यालयांतील) तब्बल १६३ वर्गखोल्या वापरण्यात येणार आहेत. यामुळे एका खोलीत फक्त २४ परीक्षार्थी राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व खोल्या २० मार्चच्या रात्री सॅनिटायझ करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उमेदवारांना ग्लास शिल्ड, मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात येणार आहे. या केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या ३०० केंद्र प्रमुख, समवेक्षक, पर्यवेक्षक, परीक्षा लिपिक, समन्वय अधिकारी आणि शिपाई यांना देखील हा ‘अतिरिक्त ड्रेस कोड’ बंधनकारक आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व आरडीसी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात ही जय्यत तयारी करण्यात आली आहे. केंद्र प्रमुखांचे प्रशिक्षण देखील घेण्यात आले. आज सकाळी १२ केंद्रांवर रंगीत तालीम देखील घेण्यात आली. याशिवाय लोकसेवा आयोगाचे पथक देखील येथे दाखल झाले आहे, पथकातील अधिकारी १२केंद्रांवर करडी नजर ठेवून राहणार आहे. याशिवाय १२ केंद्र व १६३ वर्ग खोल्यातील सर्व हालचालींवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. यावर कळस म्हणजे केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी मोबाईल जॅमर लावण्यात आले आहे.

Related posts

भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी कडून विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

nirbhid swarajya

शेतकऱ्यांना मारहाण करून बनवले मुर्गा

nirbhid swarajya

शेगाव पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता एलसीबीच्या जाळ्यात

nirbhid swarajya
error: Content is protected !!