November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आव्हान

खामगाव : महाराष्ट्र सह जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या अनुषंगाने खामगांव मधील सर्व व्यापाऱ्यांना व अस्थापना चालकांना कोविड टेस्ट बंधनकारक केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. सर्व आस्थापना चालकांनी आपली व आपल्या आस्थापना मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घ्यावी. तसेच कोविड चाचणी न केलेल्या आस्थापना सील करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी दिले आहेत. सदर कोविड चाचणीकरिता येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ६ मध्ये आरोग्य विभागाने २० मार्च रोजी दुपारी १२ वाजता कॅम्प आयोजित केला आहे. तरी सर्व आस्थापना चालकांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी उपस्थित राहून आपली कोविड चाचणी करून घ्यावी असे नगर परिषद खामगाव कडून कळविण्यात आले आहे.

Related posts

आ. संजय कुटेंच्‍या वाहनावर दगडफेक, आता पुन्‍हा वाद पेटला..!

nirbhid swarajya

कोरोना मुळे केला नोंदणी विवाह

nirbhid swarajya

विना परवाना शस्त्र व हत्यार बाळगणार्‍या दोघांना अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!