November 20, 2025
खामगाव जिल्हा नागपुर पुणे बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेतकरी

बुलढाणा जिल्हयात मध्यम पावसाची शक्यता

तुरळक/विरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, तसेच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

बुलडाणा : प्रादेशिक हवामान केंद्र नागपुर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्हयात दि.१८ मार्चला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक १९ मार्च रोजी विरळ ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची, वादळी वारे ( ३०-४० किमी/तास)वाहण्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे.त्यामुळे शेतकर्यांनी स्वत:ची व पशुधनाची यथायोग्य काळजी घ्यावी तसेच परिपक्व झालेल्या पिकांची त्वरित कापणी करावी व कापणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी . साठवणूक करणे शक्य नसल्यास शेतातील शेतमाल प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा, जेणेकरून अवकाळी पावसापासून व वादळी वार्यापासून संबंधित शेतमाल खराब होणार नाही, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

Related posts

माजी आ.सानंदा यांना येणार अच्छे दिन- ना.विजय वडेट्टीवार

nirbhid swarajya

शिवभक्त मित्र मंडल च्या वतीने छत्रपति श्री शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

nirbhid swarajya

तूर, हरभरा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

nirbhid swarajya
error: Content is protected !!