November 21, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

कोविड चाचणी केंद्रावरच सोशल डिस्टंसिंग चा फज्जा

न.प. कडून नियोजन नसल्याने उडाली झुंबड

शेगांव : नगर पालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केल्याने मागील दोन दिवसात कोविड चाचणी केंदारवर व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. यामध्ये मागील दोन दिवसात १६ जणांचे अहवाल पझेटिव्ह आढळून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढल्याने पॉझेटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये ही भरमसाठ वाढ झाली आहे. आता शेगाव नगरपालिकेने शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कोविड चाचणीसाठी सक्ती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी केंद्रावर एकच गर्दी केली. आज बुधवारी तर केंद्रावर गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. नगरपालिकेने चाचणी ची सक्ती केल्यानंतर शहरातील टाऊन हॉल येथे आरोग्य विभागा मार्फत चाचणी केंद्र उभारले मात्र येणाऱ्या व्यापार्‍यांसाठी योग्य नियोजन न केल्याने एका हॉलमध्ये दोनशे ते तीनशे लोक गर्दी करून सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविते असल्याचे दिसून आले गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Related posts

जिगाव प्रकल्पाला माॅ जिजाऊ महासागर नाव द्यावे अ.भा. मराठा महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन…

nirbhid swarajya

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत संगणक परीचलकांच्या मानधन होणार वाढ – राज्याध्यक्ष सुनीताताई आमटे

nirbhid swarajya

स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर ३० वर्षात एकदाही निवडणूक नाही

nirbhid swarajya
error: Content is protected !!