November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यवसायिकां विरुद्ध गुन्हा दाखल

खामगांव : स्‍थानिक गुन्‍हे शाखेने काल १६ मार्चला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटका व तंबाखू विक्री करणाऱ्या दोन व्यवसायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधे ९१ हजार ५०८ रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला असुन २ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्‍यावर कारवाई करण्यात आली. अवैध गुटखाविक्रीविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश एलसीबीला जिल्‍हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिले होते. त्‍यानुसार पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांनी विशेष पथके नेमली. या पथकांनी दोन दिवस जोरदार कारवाई करत गुटखा माफियांवर वचक बसवला आहे.यामधे खामगाव शहरातील आठवडी बाजारात पंकज हिरालाल छतवाणी वय ३३ रा. अमृतबाग तलाव रोड याला पकडून त्यांच्या कडून ६१हजार ७८५ रुपयांचा गुटखा जप्‍त केला आहे. तर आठवडी बाजारातिलच अनिल अमरचंद पवार वय २९ रा. मोची गल्ली याला पकडून त्याच्या कडून २९ हजार ७२३ रुपयांचा गुटखा जप्‍त केला असुन दोन्ही आरोपींकडून एकूण ९१ हजार ५०८ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरच्या दोन्ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत , अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप आढाव, पोलीस अंमलदार शेषराव अंभोरे, शे. साजीद, सय्यद हारुण, अत्ताउल्ला खान, चांदूरकर, गिता बामंदे, सुनील खरात, दीपक पवार, गजानन आहेर, पंकज मेहर, सुभाष वाघमारे, सुरेश भिसे, नीलेश वाकडे यांनी पार पाडली. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याच जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री जोरात सुरू असल्याने गुटखा माफियांवर कुठलीही वचक नसल्याचे दिसून येत आहे.

Related posts

बलात्कारातील आरोपी कारागृहातून फरार

nirbhid swarajya

शेतकरी संघटनेच्या खामगाव तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल उर्फ हेमंत मुंढे पाटील यांची नियुक्ती

nirbhid swarajya

आज प्राप्त 38 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 3 पॉझीटीव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!