शेगांव : 4 वर्षीय बालकाला इलेट्रिक हीटरने चटके देऊन जीवे मारण्याची संतापजनक घटना शेगांव येथे घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सुरेश चिंचोळकार (31, रा. भोईपुरा) यांनी महादेव सीताराम लांबे यांची जागा त्यांच्याकडून कायदेशीर खरेदी करून घेतली. मात्र पैसे कमी दिल्याचा राग धरून लांबे याच्या मनात होता. 1 सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास चिंचोलकार यांचा 4 वर्षीय दर्शन नावाचा मुलगा लांबेच्या घरासमोर खेळत असताना त्याने दर्शनला घरी बोलावले. त्याच्या छाती, मांडीसह पाठीवर इलेक्ट्रिक हीटर चटके देऊन गंभीररित्या जखमी करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चिमुकल्याची आई घटनास्थळी मुलास सोडवण्यास गेली असता लांबे याने तिलाही इलेक्ट्रिक हीटरचे चटके दिले. त्याच्या सर्वांगावर या चटक्यांमुळे जखमा झाल्या असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी लांबेविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने त्याला अटक केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. टाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे करत आहेत.