खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण देखील बरे होत आहेत. त्यातच आता एका ७५ वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. खामगांव येथील सामान्य रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या या ७५ वर्षीय आजींना आज डिस्चार्ज देण्यात आला.
ह्या आजी खामगांव येथून जवळच असलेल्या सुटाळा येथील असून त्या काही दिवसांआधी कोरोनाबाधीत आढळलेल्या होत्या. त्यानंतर या आजींना खामगांव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ, यांनी योग्यप्रकारे आजींवर उपचार केल्याने आजींनी त्यांचे कौतुक केल आणि आता या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत. या आजींना डिस्चार्ज देऊन आज सर्वांनी आजींचे अभिनंदन सुध्दा केले आहे.