खामगाव:तालुक्यातील एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा गळा दाबून खून करण्यात आली.ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील उमरा- लासूरा येथे उजेडात आली. कमलबाई जनार्दन सोनोने असे हत्या झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. वृध्देचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उजेडात आली. या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्याचप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी देखील पथकासह उमरा-लासूरा येथे पोहोचले. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.वृध्द महिलेच्या घरात पती आणि दोन बहिणी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.