खामगाव आगाराच्या वतीने दोन बसेस रवाना
खामगाव : सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय मजूर मोठ्या शहरांमध्ये अडकून पडलेले होते. लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वे बस सेवा ही बंद पडल्यामुळे मजूर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्याने पायी आपल्या घराकडे निघायला लागले आहेत. अशातच काल रात्री दरम्यान मध्य प्रदेश ओरिसा उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहार राज्यातील जाणाऱ्या ४४ परप्रांतीय मजुरांना आज दुपारी खामगाव आगाराच्या वतीने दोन बसेस रवाना करण्यात आलेल्या आहेत. हे सर्व मजूर खामगाव ते अकोला मार्गावर पायी चालत जात होते त्यांना काल रात्री प्रशासनाच्यावतीने खामगाव बस स्थानक येथे आणण्यात आले होते व त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाचा जीआर आहे त्याप्रमाणे आज या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले आहे खामगाव येथून त्यांच्या करिता दोन बसेस सोडण्यात आलेले आहेत.
तसेच प्रवासासाठी त्यांना नाश्ता, जेवण पॅकेट्स, पाणी सुध्दा पुरवल्या गेले.या परप्रांतीय मजुरांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद झळकत होता.
यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतलकुमार रसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण, खामगाव आगारप्रमुख एस एच पवार, स्थानक प्रमुख आर यु पवार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
