खामगांव : येथून जवळ असलेल्या हिंगणा कारेगाव येथील एका युवकाचा डीपीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा कारेगाव येथील दिनेश राजहंस जाधव वय 25 हा आपल्या कामावरून परतत असताना गावाजवळील एका शेतात च्या शिवारातील डीपी खाली आग लागल्याचे त्याला दिसून आले सदर आग विझवण्यासाठी तो डीपी जवळ गेला असता अचानक पणे विद्युत प्रवाह सुरू असलेल्या डीपीला त्याचा धक्का लागला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ त्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले होते मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच तेजेंद्रसिंह चव्हाण हे रुग्णालयात दाखल झाले होते. दिनेश याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. दिनेशच्या अश्या जाण्याने सर्व गावावर शोककळा पसरली आहे.