18 जण अटकेत
खामगाव : संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असतांना काही जण अश्या काळातही अवैध धंदे करून लाखोंची उलाढाल करीत आहे.
खामगाव शेगाव रोड वरील हॉटेल प्राईड येथे सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली या वेळी पोलिसांनी 18 जणांना अटक करून त्यांच्या जवळून मोबाईल कार दुचाकीसह रोख रक्कम असा एकूण 13 लाख 47 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई 7 जून रोजी करण्यात आली, हॉटेल मध्ये सुरू असलेल्या जुगार क्लब ला स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण छुप्या पाठिंबा असल्याची चर्चा शहरात होत आहे तर बुलडाणा जिल्ह्यातील ही मोठी कारवाही आहे ठरली आहे.बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना खामगाव शेगाव रोड हॉटेल प्राईड वर काही महिन्यांपासून जुगार क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शोध पथकाने सात जून रोजी हॉटेल प्राईड वर छापा मारला असता पोलिसांना 18 जणांना एक्का बादशहा नावाचा पैशाचा हार-जीत जुगार खेळताना बुलडाणा गुन्हे शाखे च्या पथकाला मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून 17 मोबाईल, दहा दुचाकी कार व रोख रक्कम एक लाख 99 हजार 150 रुपये असा एकूण 13 लाख 47 हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींमध्ये हॉटेल संचालक योगेश उर्फ पिंटू जाधव, धम्मदीप तायडे, पंकज घोरपडे, शंकर लोड, संजय राठी, दीपक वाकोडे, बन्सीलाल राठी, संतोष वेळूकर, गिरीश कोठारी, गणेश तांबट, प्रवीण भुतडा ,संजय धनोकार,पवन तनपुरे, हिम्मत रोजिया, राजू चोपडे, सागर बाजड, कपिल शेळके, शंकर उगले या 18 जणांचा समावेश असून त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध शहर पोस्टेला कलम 188, 269, 270 कलम 51 व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र covid-19 उपाय योजना 2020 चे नियम 11 व साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 कलम तीन प्रमाणे खामगाव शहर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे व लॉकडाऊनच्या काळातील जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाही असल्याचे बोलल्या जात आहे.