नागापुरला हिंदुराष्ट्र सेनेची शाखा स्थापन…
खामगाव : तालुक्यात नागापूर येथे हिंदुराष्ट्र सेनेची ग्राम शाखा स्थापन करण्यात आली पूत्रदा एकादशी व श्रावण मासा चे पवित्र पर्व साधून शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला ,या समारंभाला युवक वर्ग व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष या शाखा समारंभ प्रसंगी जिल्ह्याचे अध्यक्ष विजय पवार,युवा अध्यक्ष सागर बेटवाल,संघटक रवी माळवंदे, खामगाव शहर प्रमुख राजेश तांबटकर, आनंद सिंग चव्हाण, सोनू चव्हाण हिंदुराष्ट्र सेना विदर्भ विस्तारक वारकरी आघाडी डॉ गजानन उन्हाळे पाटील खामगाव ता. अध्यक्ष वैभव टेकाळे, प्रचारक ह भ प किरण महाराज शिंदे उपस्थित होते .
प्रसंगी सर्वांनी विचार मांडले हिंदुराष्ट्र सेना कुठल्याही राजकीय पक्षाची बटिक नसून सर्व हिंदूंना सोबत घेऊन चालते कुठलाही स्वार्थ न पाहता जो हिंदूंच्या हितासाठी उभा असतो अशा लोकांना हिंदुराष्ट्र सेना सहकार्य करते त्यामुळे मूळ हिंदुत्व विचारधारा जोपासणे हे अत्यंत महत्त्वाचे असून देव ,देश, धर्मकार्य कुठल्याही कठोर प्रसंगाला सामोरे जाऊन हिंदू राष्ट्र सेना करते असे मत विजय पवार यांनी मांडले प्रसंगी शाखाध्यक्ष विठ्ठल घाईत शाखा उपाध्यक्ष प्रदीप राठोड संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार कोषअध्यक्ष विठ्ठल तीव्हाने सचिव देवेंद्र वाकडे यांच्या नावांची घोषणा झाली.कार्यक्रमाचे सूत्रंचालन किरण महाराज शिंदे यांनी केले